Rajmata Jijau Jayanti 2023: राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथे साकारले 15 हजार चौरस फुटांचे रेखाचित्र

या जयंतीचे औचित्य साधत अहमदनगरच्या जामखेड येथील नागेश महाविद्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे 15,000 स्क्वेअर फुटमध्ये रेखाचित्र साकारले आहे.

A statue of Rajmata Jijabai (Photo Credits: Facebook/Arya Samaj)

राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारीला तारखेनुसार जयंती. जिजाबाईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, संभाजी राजांना आईच्या पदराची उब दिली. उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची जयंती उत्साहात साजरी होईल. या जयंतीचे औचित्य साधत अहमदनगरच्या जामखेड येथील नागेश महाविद्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे 15,000 स्क्वेअर फुटमध्ये रेखाचित्र साकारले आहे. जिजाऊ साहेबांना मानवंदना देण्यासाठी जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हे जगातील सर्वात मोठे रेखाचित्र साकारले गेले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)