Mangalagaur Competition 2023: मुंबई भाजपकडून मंगळागौर स्पर्धेचे आयोजन; 21 ऑगस्टपर्यंत करू शकता नोंदणी, जाणून घ्या बक्षिसे व अटी (Watch Video)

स्पर्धेची आणतील फेरी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Mangalagaur (Photo Credits: YouTube)

मुंबई भाजपकडून मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 3 लाख 51 हजाराचे पहिले बक्षीस असून, दुसरे बक्षीस 2 लाख 11 हजाराचे आहे. या स्पर्धेसाठी 21 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी करू शकता. स्पर्धेची आणतील फेरी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दुसरीकडे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शुक्रवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात दुपारी 3 वाजता मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, "मंगळागौर सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, नीलम गोर्‍हे, विधानपरिषदेच्या सभापती भावना गवळी, खासदार मनीषा कायंदे, आमदार आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)