Maharana Pratap Jayanti 2022: महाराणा प्रतापसिंह यांची जयंती 25 ऐवजी 2 जून रोजी साजरी होणार
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार २ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे
सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार बुधवार दिनांक २५ मे २०२२ रोजी साजरी करण्यात येणार होती. ती आता २५ मे ऐवजी २ जून २०२२ रोजी साजरी होणार आहे.
शासनाने दिनांक ५ मे २०२२ रोजी शुध्दीपत्रक काढले असून त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार २ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची ( तिथीनुसार ) जयंती आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)