Last-Minute Mehndi Designs For Ramzan 2022: ईद अल-फितर हा इस्लामिक धर्मातील सर्वात मोठा सण आहे आणि तो रमजानच्या उपवासाच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीस चिन्हांकित करतो. हा सण उपवासाच्या महिन्यात लोकांच्या भक्तिभावाने साजरा करतो. भारतात 3 मे रोजी ईद अल-फितर साजरी केली जाईल. जगभरातील मुस्लिम समुदाय प्रार्थना करून, कुटुंब आणि मित्रांसाठी रात्रीचे जेवण आयोजित करून आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करून हा सण साजरा करतात.
यादिवशी लोक त्यांची घरे देखील सजवतात आणि नवीन कपडे व दागिने घालतात. या सणासाठी महिला हातांवर मेहंदी काढतात. मेहंदी सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करते, असे म्हटले जाते. ईद हा एक महत्त्वाचा सण आहे. अनेकदा काही स्त्रीयांना मेहंदी लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा स्त्रीयांसाठी झटपट मेहंदी डिझाईनची आवश्यकता असते. म्हणून आम्ही तुमच्यासाठी येथे ईद-उल-फितर 2022 साठी काही सोप्या शेवटच्या-मिनिटांत काढता येतील, अशा मेहेंदी डिझाइन्स संकलित केल्या आहेत. तुम्ही कॉटन बडच्या साह्य्याने खालील व्हिडिओ पाहून शेवटच्या क्षणी मेहेंदी ईद अल-फितर 2022 साठी खास मेहंदी डिझाइन काढू शकता.
पहा मेहेंदी डिझाईन -
Simple Eid al-Fitr 2022 Mehndi Designs
Quick Eid al-Fitr Mehndi Desgin
Easy Last-Minute Eid Mehndi Design 2022
Last-Minute Eid Mehndi Design 2022
Latest Easy Mehndi Design 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)