Siddhivinayak Aarti Live Darshan on Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थी दिवशी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक गणपतीचं इथे घ्या लाईव्ह दर्शन!

आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे. पण मंदिरं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने यंदा बाप्पाचं दर्शन घरात बसूनच घ्यावं लागणार आहे. मुंबईकरांच्या लाडक्या सिद्धिविनायकाचं दर्शन यंदा घरबसल्या घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Siddhivinayak Aarti Live Darshan on Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थी दिवशी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक गणपतीचं इथे घ्या लाईव्ह दर्शन!
Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

गणेश चतुर्थी दिवशी पार्थिव गणपती पूजन करण्याची रीत आहे. काही घरात बाप्पाची मूर्ती आणून गणरायाचं दर्शन घेतलं जातं तर ज्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत नाही तेथे अनेक गणेश मंदिरांमध्ये किंवा नातेवाईकांकडे दर्शनाला जातात.यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळं बंद असल्याने बाप्पाचं देवळात दर्शन होऊ शकत नाही. मग प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन तुम्हांला आज घरबसल्या त्यांच्या युट्युब चॅनेलवरून किंवा Shree Siddhivinayak Ganapati Temple App  द्वारा होऊ शकतं.

प्रभादेवी सिद्धिविनायक लाईव्ह दर्शन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2021 12:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).