Zomato Pure Veg Fleet : झोमॅटोच्या 'प्युअर व्हेज फ्लीट' सुविधेला ग्राहकांकडून वाईट प्रतिसाद; घोषणेनंतर काही तासांतच कंपनीने निर्णय बदलला
मात्र काही तासांतच त्यांना त्यांचा हा निर्णय बदलावा लागला आहे.
Zomato Pure Veg Fleet : झोमॅटोने काल (मंगळवारी) आपल्या शाकाहारी ग्राहकांसाठी प्युअर व्हेज मोड सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. ज्यात शाकाहारी ग्राहकांसाठी खास हिरव्या रंगामध्ये डिलिव्हरी बॉयचा शर्ट आणि डिलिव्हरी बॉक्स वापरण्यात येणार होता. त्याशिवाय ते जेवण फक्त शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमधलेच असणार होते. मात्र, या सेवेला ग्राहकांकडून वाईट प्रतिसाद मिळाला. आपण व्हेज (veg food) खातोय की नॉनव्हेज (non-veg food ), हे समाजाला सांगू नये, असंही अनेकांनी म्हटले. त्यावर, बुधवारी उशीर न करता गोयल यांनी आपला निर्णय बदलला आहे. त्याबाबतचे ट्विट दीपंदर गोयल (Deepinder Goyal ) यांनी केले आहे. (हेही वाचा : Zomato Pure Veg Fleet: झोमॅटो कंपनीची ग्राहकांसाठी खास सेवा, नागरिकांना मिळणार शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)