PM Modi Security Breach: वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बुलेटप्रूफ कारवर तरुणाने फेकली चप्पल; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ, पहा

हा क्षण कॅप्चर करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये गर्दीतील एका तरुणाने मोदींच्या गाड्यांच्या ताफ्याच्या दिशेने चप्पल फेकल्याचं दिसत आहे.

Slipper Thrown at PM Modi's Bulletproof Car (PC - X@MadhuriDaksha)

PM Modi Security Breach: वाराणसी दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बुलेटप्रूफ कारवर (Bulletproof Car) चप्पल फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा क्षण कॅप्चर करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये गर्दीतील एका तरुणाने मोदींच्या गाड्यांच्या ताफ्याच्या दिशेने चप्पल फेकल्याचं दिसत आहे. मात्र, या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पीएम मोदींच्या सुरक्षा भंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ही घटना घडली. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now