Hydrabad Accident: हैद्राबादमध्ये स्टंट करताना तरुणाचा मृत्यू, स्कूटी अनियंत्रित झाल्याने अपघात

तेलंगणातील हैद्राबादमध्ये स्टंट करत असताना दुचाकी ट्रकला आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Accident Hydrabad PC Twitter

Hydrabad Accident:  तेलंगणातील हैद्राबादमध्ये स्टंट करत असताना दुचाकी ट्रकला आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत असे मृताचे नाव असून तो काचीगुडा येथील रहिवासी होता. श्रीकांत रात्रीच्या वेळीस मित्रांसोबत स्टंट करत होता. तेव्हा ही घटना घडली. हैद्राबाद येथील जुन्या बस्ती गल्लीत स्टंट करत होता. श्रीकांतचा स्कूटरवरील ताबा सुटला आणि पुढे जाऊन भरधाव ट्रकला आदळला. ट्रकच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.स्टंटबाजी करत असताना त्याचा स्कूटवर अनियंत्रित झाली आणि ट्रकला धडक दिली.