Viral Video: केरळच्या त्रिशूरमध्ये एका वृध्द व्यक्तीने दिवसाढवळ्या एका तरुणीची छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा विरोध करत पीडित तरुणीने आरोपी वृध्दाला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पीडित तरूणी किराणा दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी आली आणि दुकानदाराने मुलीच्या स्तनाला हात लावला. अली असे या वृद्धाचे नाव असून ते त्रिशूर मेडिकल कॉलेजजवळ किराणा दुकान चालवतात. व्हिडिओमध्ये ही मुलगी वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करताना दिसत आहे आणि चप्पलने मारहाण केली. मुलीने आरोप केला आहे की, वृद्धाने तिचे स्तनाला हात लावला. त्यानंतर आरोपीला माफी मागण्यास सांगितले. त्या व्यक्तीने तरुणीची माफी मागितली आणि तिला त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार न करण्यास सांगितले.
किराने की दुकान चलाने वाले अली नाम के बुजुर्ग व्यक्ति ने सामान खरीदने आई एक लड़की के स्तनों को पकड़ा।
यह घटना केरल के त्रिशूर मेडिकल कॉलेज के पास हुई। pic.twitter.com/sjIjeszLuV
— Sarvesh kumar (@Sarvesh38453373) January 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)