Jharkhand News: झारखंड मध्ये दोन विद्यार्थिनी पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकल्या, सीआरपीएफच्या मदतीने सुखरूप बाहेर

झारखंड मधील गिरडीह जिल्ह्यातील पिरतांड भागात दोन विद्यार्थिनी पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकल्या.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Jharkhand Viral news

Jharkhand News: झारखंड मधील गिरडीह जिल्ह्यातील पिरतांड भागात दोन विद्यार्थिनी पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकल्या. मात्र ही घटना पाहताच, स्थानिकांनी आणि सीआरपीएपच्या मदतीने जवानांनी दोरी आणि बांबूच्या सहाय्याने मुलींना बाहेर काढण्यात यश आले. मधुबन- पांडेडीह रस्त्यावरील बेदी येथे ही घटना घडली. दोन शाळकरी विद्यार्थीनी पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकल्या. काही वेळातच मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी दाखल झाल्या. रम्यान, सीआरपीएफ पर्वतपूर कॅम्पलाही याबाबत माहिती देण्यात आली. सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट पंकज कुमार आणि इतर सीआरपीएफ जवान आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दोरी आणि बांबूच्या सहाय्याने मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement