Tamilnadu News: निलगिरीत बिबट्याचा पत्रकारासह सहा जणांवर हल्ला, वनविभागाकडून शोध मोहिम सुरु

तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात कुन्नरजवळ बिबट्याने हल्ला केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.

Tamilnadu News: तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात कुन्नरजवळ बिबट्याने हल्ला केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्रकारासह सहा जण या घटनेत जखमी झाले आहे. कुत्र्याचा पाठलाग करत जंगलातून बाहेर आलेला बिबट्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नरजवळ येथे घुसला. रहिवाशांवर हल्ला केला. रहिवाशांनी तत्काळ कुन्नर वनविभाग आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. वनविभागाच्या माहितीनुसार, आता पर्यंत त्यांनी सहा जणांवर हल्ला केला. एका पत्रकारावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम कार्यरत आहे. आम्ही बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. अधिकारी पुढील कारवाई करत आहे. कुन्नर परिसरात अनेक बिबट्या दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पाणी आणि अन्नाच्या शोधात बिबट्या बाहेर भटकत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement