Varanasi Mass Suicide: एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास लावून केली आत्महत्या, वाराणसीतील घटना

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातून वाराणसीत आलेल्या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Varanasi Mass Suicide: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातून वाराणसीत आलेल्या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. देवनाथपुरा येथील काशी कैलास भवनच्या खोलीत गुरुवारी सायंकाळी कुटुंबीयांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीला तुळईच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यूपी पोलिसांसह आलेल्या फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने घटनास्थळाचा तपास केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आंध्र प्रदेशातील हे कुटुंब आर्थिक परिस्थिती बिकड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement