Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद प्रकरणी हिंदू पक्षाला झटका; वाराणसी न्यायालयाने फेटाळली 'शिवलिंग'च्या कार्बन डेटिंगच्या चौकशीची मागणी
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगच्या चौकशीची मागणी फेटाळण्यात आली आहे.
Gyanvapi Mosque Case: वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगच्या चौकशीची मागणी फेटाळण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. मंगळवारी मुस्लीम पक्षाने आक्षेप नोंदवून युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
शृंगारगौरीसह इतर देवतांच्या पूजेच्या अधिकाराच्या मुद्द्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान झालेल्या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीच्या वुजुखानात शिवलिंगासारखी आकृती आढळून आली. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील हरिशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन यांनी कार्बन डेटिंगसह इतर वैज्ञानिक पद्धतींनी तपास करण्यासाठी हिंदू बाजूच्या पाचपैकी चार याचिकाकर्त्यांच्या वतीने अर्ज सादर केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)