Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath आणि भूतानचे राजा Jigme Khesar Namgyel Wangchuck यांचे त्रिवेणी संगमात स्नान; अक्षयवटचे दर्शन घेतल्यानंतर, हनुमान मंदिरात पूजा (See Photo)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यासोबत त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. च्यानंतर त्यांनी अक्षयवटला भेट दिली. यानंतर हनुमान मंदीरात पूजा केली.

Photo Credit- X

Mahakumbh 2025: भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (Jigme Khesar Namgyel Wangchuck) यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. त्यानंतर अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट दिली. दोन्ही नेत्यांनी डिजिटल महाकुंभ अनुभूती केंद्रालाही भेट दिली. शतकातील सर्वात मोठ्या महाकुंभमध्ये (Maha Kumbh 2025) स्नान करण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक असताना आत्तापर्यंत अनेक विदेश पाहूण्यांची प्रयागराजमध्ये (Prayagraj) उपस्थिती पहायला मिळाली. जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक सोमवारी थिंपूहून लखनऊला पोहोचले होते. मुख्यमंत्री योगी त्यांचे स्वागत महाकुंभमध्ये स्वागत केले. संगमावर स्नान आणि ध्यान केल्यानंतर, भूतानचे राजा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अक्षयवटला भेट देण्यासाठी पोहोचले. यानंतर, दोन्ही नेत्यांनी बडे हनुमानजींच्या मंदिरात पूजा कले. (Mahakumbh 2025: अवघ्या 1,296 रूपयांमध्ये हेलिकॉप्टरमधून महाकुंभ पाहता येणार; www.upstdc.co.in द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करता येणार)

भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची महाकुंभला उपस्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement