UP Video: सोसायटीच्या आत प्रवेश नाकारल्याने उपनिरिक्षकाने व्हॉचनमनला लगावली कानाखाली, घटनेचा निषेध करत सुरक्षा रक्षक संपावर

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा वेस्टच्या रेसिडेन्सि सोसायटीमध्ये एका उपनिक्षकाने व्हॉचमनला कानाखाली लगावली.

UP Video

UP Video: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा वेस्टच्या रेसिडेन्सि सोसायटीमध्ये एका उपनिक्षकाने व्हॉचमनला कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. एकापाठोपाठ दोनदा कानाखाली लगावल्याने याचा निषेधार्थ आज सर्व सुरक्षा रक्षक संपावर आहेत. उपनिरिक्षकावर एफआयआर नोंदवून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. थप्पड मारणाऱ्या उपनिरिक्षकाला सोसायटीट्या आत जायचे होते, मात्र सोसायटीच्या इमारतीत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षाकने त्यांना आत जाऊ दिले नाही. कारण इन्स्पेक्टरच्या गाडीवर कोणतेही स्टिकर नव्हते. त्यामुळे संतापून त्याने गार्डला चापट मारली. इन्स्पेक्टरने सुरक्षा रक्षकाला थप्पड मारल्यानंतर त्याच्या निषेधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now