UP Shocker: बरेलीत छेडछाड करून तरूणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं, घटनेत पीडितीने हात आणि पाय गमावले; एकाला अटक

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीला तिला दोन तरुणांनी चालत्या ट्रेनसमोर फेकून दिल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.

UP shocker News

UP Shocker: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीला तिला दोन तरुणांनी चालत्या ट्रेनसमोर फेकून दिल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तिनं हातपाय गमवाल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीची छेडछाड करून तीला ट्रेन मधून फेकून दिले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या शरिरावर अनेक फ्रॅक्चरही झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी ही घटना घडली. पीडित तरुणी जेव्हा मुलगी कोचिंगवरून परतत होती. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेची मुख्यमंत्री योगी यांनी दखल घेतली असून प्रभारी निरीक्षक, चौकी प्रभारी आणि बीट कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. यातील एका आरोपी तरुणाला आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुलीला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)