UP Road Accident Video: महापालिकेच्या वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, चालकाला अटक, लखनऊ येथील घटना
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये बुधवारी दुपारी चारच्या सुमारास एक ६० वर्षीय महिला आपल्या मुलीसोबत स्कूटीवरून जात होती.
UP Road Accident Video: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. (22 नोव्हेंबर) बुधवारी दुपारी चारच्या सुमारास एक 60 वर्षीय महिला आपल्या मुलीसोबत स्कूटीवरून जात होती. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध महापालिकेच्या वाहनाने महिलेला चिरडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. मजहर खान असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)