UP Shocker: गरम खिरीच्या भांड्यात पडून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू; छठपूजेच्या मेजवानीवेळी घडली घटना
कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर काव्याची प्रकृती चिंताजनक पाहून तिला पडरौना येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले,
उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावात गरम खिरीच्या भांड्यात पडून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार मंगळवारी अशोक यादव यांच्या घरी छठपूजेच्या वेळी ही घटना घडली. कुटुंब मेजवानीची तयारी करत होते. जेवणासाठी अनेकांना निमंत्रित करण्यात आले होते. एका मोठ्या कढई खीर शिजत होती. त्याचवेळी शेजारी खेळत असलेली मुलगी खीर शिजत असलेल्या मोठ्या भांड्यात पडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर काव्याची प्रकृती चिंताजनक पाहून तिला पडरौना येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले, मात्र जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निष्पाप काव्याचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार; 2 जण अटकेत)
In a tragic incident, a five-year-old girl died after falling into hot kheer vessel in a village #UttarPradesh's Kushinagar district.
The incident took place on Tuesday during culmination of #ChhathPuja in house of Ashok Yadav. As family was preparing for the feast, Kavya, who… pic.twitter.com/oer9QewibT
— IANS (@ians_india) November 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

