UP Encounter: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पोलिस आणि आरोपींमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत एका आरोपीला गोळी लागल्याने जखमी झाला आहे. जखमी झालेल्या आरोपीचे नाव विकास आहे. या चकमकीतून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर भट्ट व्यावसायिक योगेंद्र शर्मा यांच्या हत्येचा आरोप आहे. खंडणीच्या मागणीसाठी तिन्ही आरोपींनी योगेंद्र शर्मा यांची हत्या केली होती. तेव्हापासून तिघेही फरार होते. आरोपींसोबत झालेल्या एन्काऊंटरचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक जण जखमी झाल्यानंतर जमिनीवर पडला आहे. (हेही वाचा- ठाण्यात वर्दळीच्या रस्त्यावर ऑटो-रिक्षा प्रवाशांची चेन लुटताना 2 दुचाकीस्वार कॅमेऱ्यात कैद)
गाजियाबाद: भट्टा व्यापारी योगेंद्र शर्मा की 'फिरौती के लिए हत्या' के आरोपी के साथ पुलिस की मुठभेड़ में तीन में से एक बदमाश हुआ घायल। पुलिस ने तीन आरोपियों को किया गिरफ्तार। मामले में आरोपी विकास घायल हुआ है।#Ghaziabad #UPPolice #UttarPradesh pic.twitter.com/9YL6avNJbN
— UP Tak (@UPTakOfficial) May 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)