International Yoga Day 2023: हाजीपूरमध्ये योगा करताना केंद्रीय मंत्र्यांची प्रकृती खालावली; अचानक स्टेजवर कोसळले पशुपती पारस

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस बुधवारी सकाळी हाजीपूरच्या कोनहराजवळ आयोजित योग शिबिरात योग करण्यासाठी पोहोचले होते.

Union minister Pashupati Paras (PC - Twitter)

International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा करत असताना केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते व्यासपीठावर पडले, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि त्यांच्या पीएने पशुपती कुमार पारस यांना उचलून सोफ्यावर बसवले. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस बुधवारी सकाळी हाजीपूरच्या कोनहराजवळ आयोजित योग शिबिरात योग करण्यासाठी पोहोचले होते. मंत्री इतरांसह व्यासपीठावर योग करत होते. मध्येच अचानक पशुपती पारस यांची प्रकृती खालावली. (वाचा - Yoga In Local Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी केला योगा; पहा व्हायरल व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now