Accident Caught on Camera in Hyderabad: अनियंत्रित कारची धडक, तीन जण जखमी, हैद्राबाद येथील घटना

तेलंगणातील हैद्राबाद येथील एका वेगवार कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या स्थानिक लोकांना आणि दुचाकींना उडवले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Accident Caught on Camera in Hyderabad pc tw

Accident Caught on Camera in Hyderabad: तेलंगणातील हैद्राबाद येथील एका वेगवार कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या स्थानिक लोकांना आणि दुचाकींना उडवले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैद्राबाद येथील जवाहर नगर येथील भागात ही घटना घडली आहे. 21 जून रोजी ही घटना घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना आणि नागरिकांना धडकली. अपघातात सुबान नावाच्या व्यक्तीला कार धडकली. यात ते गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार चालकाची ओळख अझर अशी पटली आहे.  (हेही वाचा- विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement