Twitter Blue Tick: मस्कच्या घोषणेनंतर ट्विटरने ब्ल्यू टिक्स काढण्यास केली सुरुवात; राजकीय नेत्यांपासुन ते बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या ब्ल्यू टिक्स गायब

मस्कने 12 एप्रिललाच ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, 20 एप्रिलपासून, व्हेरिफाईड अकाउंटमधून लीगेसी ब्लू टिक मार्क काढून टाकले जाईल. मस्क यांनी सांगितले होते की जर ब्लू टिकची आवश्यकता असेल तर दरमहा पैसे द्यावे लागतील.

एलॉन मस्कच्या घोषणेनंतर मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने व्हेरिफाईड अकाउंट्समधून फ्री ब्लू टिक्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी ब्लू टिक प्लॅनसाठी पैसे भरलेले नाहीत. भारतात सीएम योगी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बसपा प्रमुख मायावती, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या ब्लू टिक्स ट्विटरवरून हटवण्यात आल्या आहेत. मस्कने 12 एप्रिललाच ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, 20 एप्रिलपासून, व्हेरिफाईड अकाउंटमधून लीगेसी ब्लू टिक मार्क काढून टाकले जाईल. मस्क यांनी सांगितले होते की जर ब्लू टिकची आवश्यकता असेल तर दरमहा पैसे द्यावे लागतील. म्हणजे जर एखाद्या वापरकर्त्याला ब्लू टिक हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक टिकवून ठेवायची असेल, तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरू होते. मोबाईल वापरकर्त्यांसाठी ते दरमहा 900 रुपये आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement