HC On Controlling True Love: किशोरवयीन मुलांमधील खरे प्रेम कठोर कायद्याने किंवा राज्याच्या कारवाईने नियंत्रित केले जाऊ शकत नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण

किशोरवयीन मुलांमधील खरे प्रेम (True Love) कठोर कायद्याने किंवा राज्याच्या कारवाईने नियंत्रित केले जाऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

Allahabad High Court (PC - Wikimedia commons)

HC On Controlling True Love: अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) प्रेमी युगलांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. किशोरवयीन मुलांमधील खरे प्रेम (True Love) कठोर कायद्याने किंवा राज्याच्या कारवाईने नियंत्रित केले जाऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. यासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं की, दोन व्यक्तींमधील खरे प्रेम, एक किंवा दोघेही बहुसंख्य किंवा अल्पवयीन असू शकतात, कायद्याच्या कठोरतेने किंवा राज्य कारवाईद्वारे त्यांना नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या खंडपीठाने पुढे नमूद केले की, ज्या प्रकरणांमध्ये जोडपी प्रौढ असल्याने विवाहबंधनात अडकतात. त्या प्रकरणात त्यांच्या पालकांनी नवरा-मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची कारवाई म्हणजे त्यांच्या वैवाहिक नातेसंबंधात विष कालवण्यासारखे आहे. (हेही वाचा - SC on Unmarried Woman and Surrogacy: 'देशात विवाह संस्थेचे संरक्षण केले पाहिजे, पाश्चात्य देशांचे अनुकरण करता येणार नाही'; न्यायालयाने फेटाळली अविवाहित महिलेची सरोगसीची याचिका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)