Navsari Accident: गुजरातच्या नवसारीमध्ये चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; कारच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू
यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 32 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
Navsari Accident: गुजरातमधील नवसारी येथे शनिवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात कार आणि बसची थेट धडक झाली. यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 32 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वेस्मा गावाजवळ ही घटना घडली. बस चालकाला चालत्या वाहनात हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसने कारला धडक दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)