Hindu Remarks Row: राहुल गांधींच्या भाषणाचा विपर्यास करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, शंकराचार्य यांनी हिंदू धर्मासंबंधीच्या विधानावर केले भाष्य (Watch Video)

राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत संसदेत विधान केल्याचे मला समजल्यावर मी त्यांचे संपूर्ण भाषण काढून पाहिले. यावेळी त्यांनी हिंदू धर्माविरुद्ध काहीही बोलले नसल्याचे मी पाहिले. हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, एवढेच ते म्हणाले, जे खरे आहे.

Photo Credit - X

Hindu Remarks Row: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत संसदेत विधान केल्याचे मला समजल्यावर मी त्यांचे संपूर्ण भाषण काढून पाहिले. यावेळी त्यांनी हिंदू धर्माविरुद्ध काहीही बोलले नसल्याचे मी पाहिले. हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, एवढेच ते म्हणाले, जे खरे आहे. त्यांच्या अर्ध्या विधानाचा विपर्यास करून त्याचा प्रसार करणे हा गुन्हा आणि अपप्रचार आहे. असे करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा हा व्हिडिओ भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी शेअर केला आहे. भाजपवर जोरदार हल्ला चढवत त्यांनी लिहिले की, शंकराचार्यजींनी भाजपचा संपूर्ण प्रचारच उधळून लावला नाही तर देशाला धडाही शिकवला.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now