Gyanvapi Mosque Contoversy: ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणीला कनिष्ठ न्यायालयात स्थगिती, उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
तत्पूर्वी, हिंदू पक्षाचे वकील विष्णुशंकर जैन म्हणाले की, ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे ज्ञानवापी खटल्याची सुनावणी उद्या होईल.
वाराणसीमधील (Varanasi) प्रसिद्ध ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Mosque Contoversy) सर्वोच्च न्यायालयाने (SC) गुरुवारी सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणी सुनावणी करू नये किंवा आदेश जारी करू नये, असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणावर उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने या प्रकरणी कोणताही आदेश देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, हिंदू पक्षाचे वकील विष्णुशंकर जैन म्हणाले की, ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे ज्ञानवापी खटल्याची सुनावणी उद्या होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)