Ram Mandir Consecration: सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला झटका; अयोध्या राम मंदिर अभिषेक कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावरील बंदी मागे घेण्याचे दिले आदेश
. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली होती. रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत ट्विट करून डीएमके सरकारवर टीका केली होती. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
Ram Mandir Consecration: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तामिळनाडू सरकारला (Tamil Nadu Government)अयोध्या राम मंदिर अभिषेक कार्यक्रमाच्या (Ram Mandir Consecration) थेट प्रक्षेपणावरील बंदी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली होती. रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत ट्विट करून डीएमके सरकारवर टीका केली होती. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर सीतारामन यांनी म्हटलं होतं की, TN सरकारने 22 जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिर कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे. TN मध्ये श्री रामाची 200 हून अधिक मंदिरे आहेत. HR&CE व्यवस्थापित मंदिरांमध्ये श्री रामाच्या नावाने पूजा/भजन/प्रसादम/अन्नदानमला परवानगी नाही. खासगी मंदिरांनाही पोलीस कार्यक्रम आयोजित करण्यापासून रोखत आहेत. पंडाल पाडू, अशी धमकी ते आयोजकांना देत आहेत. या हिंदुविरोधी, द्वेषपूर्ण कृतीचा तीव्र निषेध.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)