Telangana News: वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, हनुमाकोंडा येथे खळबळ, चौकशी सुरू
तेलंगणातील हनुमाकोंडा येथील वसतिगृहात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Telangana News: तेलंगणातील हनुमाकोंडा येथील वसतिगृहात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाने वसतिगृहाच्या खोलीत शुक्रवारी 12 जानेवारी रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले आहे हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली.घटनास्थळी पोलिस दाखल झाले. एएनआय या वृत्त संस्थेने माहिती प्रसारित केले आहे. हसनपर्थी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक टी गोपी हे या प्रकरणी चौकशी करत आहे. विद्यार्थी बी एस सी कृषी शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)