Uttar Pradesh: भरधाव कारची मोटरसायकलला धडक, व्यापाराचा मृत्यू, रिक्षातून नेला मृतदेह (Watch Video)

उत्तर प्रदेशातील शामिली येथे एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलास्वारचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Up Accident PC TW

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील शामिली येथे एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलास्वारचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हा कपड्याचा व्यापारी होता. कारने धडक मारल्यानंतर तरुण काही अतंरावर खेचला गेला. योगेश असं तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह एका रिक्षेतून नेला. ज्यातून त्याचे पाय खाली लटकलेले दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. या घटनेनंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना सहानपूर हायवे जवळ घडली. (हेही वाचा- स्कूल बस आणि BMW कारची एकमेकांना धडक, दोन विद्यार्थी जखमी, पिंपरी चिंचवड येथील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now