Karnataka Shocker:  कर्नाटकातील बेंगळुरु येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेंगळुरुमधील पीएस टीळक नगर भागात नवजात बाळाला इमारतीबाहेर फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने दिल्ली सामाजिक कार्यकर्त्या, संसद सदस्य आणि माजी अध्यक्ष, दिल्ली महिला आयोग- स्वाती मालीवाल यांनी X वर पोस्ट केली आहे. पोस्ट मध्ये त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाळाला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंरतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)