Satyendra Jain यांची 2 वर्षानंतर तुरुंगातून सुटका, मुख्यमंत्री आतिशी आणि सिसोदिया यांच्यासह अनेक आपचे नेत्यांनी तिहार तुरुंगाबाहेर लावली हजेरी, पहा व्हिडिओ

सत्येंद्र जैन यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी, मनीष सिसोदिया यांनी तुरुंगाबाहेर त्यांचे स्वागत केले आहे.

Satyendra Jain Released From Jail (फोटो सौजन्य - ANI)

Satyendra Jain Released From Jail: मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आप नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी, मनीष सिसोदिया यांनी तुरुंगाबाहेर त्यांचे स्वागत केले आहे. तथापी, सत्येंद्र जैन यांच्या सुटकेपूर्वी आप कार्यकर्त्यांकडून तिहार तुरुंगाबाहेर मिठाईचे वाटप करण्यात आले. (हेही वाचा - Satyendar Jain Gets Bail: मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांना दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर; लवकरच तुरुंगातून बाहेर येणार)

सत्येंद्र जैन यांची तिहार तुरुंगातून सुटका; दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, मनीष सिसोदिया यांनी तुरुंगाबाहेर केले स्वागत - 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement