Sakshi Murder Case: दिल्लीतील शाहबाद डेअरीमध्ये साक्षीची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक

शाहबाद डेअरी परिसरात एसी मेकॅनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी साक्षी या त्याच्या 16 वर्षीय मैत्रिणीच्या निर्घृण हत्येसाठी अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी साहिलने साक्षीवर अनेक वेळा चाकूने वार केले आणि तिचे डोके दगडाने ठेचले.

Sakshi Murder Case: दिल्लीतील शाहबाद डेअरीमध्ये साक्षीची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक
Sakshi Murder Case accused Sahil (PC- Twitter/ANI)

Sakshi Murder Case: दिल्ली पोलिसांनी सोमवारी दुपारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून 20 वर्षीय साहिलला ताब्यात घेतले. शाहबाद डेअरी परिसरात एसी मेकॅनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी साक्षी या त्याच्या 16 वर्षीय मैत्रिणीच्या निर्घृण हत्येसाठी अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी साहिलने साक्षीवर अनेक वेळा चाकूने वार केले आणि तिचे डोके दगडाने ठेचले. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शाहबाद डेअरी पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Delhi Girl Murder Video: दिल्ली पुन्हा हादरली! शहरातील शाहाबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).