Delhi Girl Murder Video: दिल्ली पुन्हा हादरली! शहरातील शाहाबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Delhi Girl Murder Video (Photo credits: Twitter/@mukeshmukeshs)

Delhi Girl Murder Video: दिल्लीच्या शाहबाद डेअरी (Shahbad Dairy) परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका 16 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या मित्राने तिच्यावर दगडाने 20 वेळा वार केले. दिल्लीतील शाहबादमधील जेजे कॉलनीतील तिच्या घराबाहेर तरुणीवर चाकूने वार करण्यात आला. ही भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भीषण गुन्ह्यातील मुख्य संशयित साहिल हा तरुणीचा मित्र असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण, ते ही हृदयद्रावक घटना घडण्यापासून रोखू शकले नाहीत. एका धाडसी व्यक्तीने साहिलचा हात धरून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील साहिल तरुणीनीवर दगडाने वार करत राहिला.

DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटरमध्ये म्हटलं आहे की, आयोग या घटनेबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करत आहे. दिल्लीच्या शाहबाद डेअरीमध्ये एका अल्पवयीन निष्पाप बाहुलीला भोसकून दगडाने ठेचून मारण्यात आले. दिल्लीतील गुन्हेगारांचे मनोधैर्य उंचावले आहे. पोलिसांना नोटीस बजावून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत यापेक्षा भयानक घटना मी कधीच पाहिली नाही, असंही मालीवाल यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Pune Shocker! गर्लफ्रेंड चिडली बॉयफ्रेंडशी भिडली, सुरीचा वार, 'तो' आयुष्यातून हद्दपार; तिच्या कृत्याने पुणे हादरलं)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच जारी करण्यात आलेल्या निवेदनात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, साहिल आणि मृतक हे नातेसंबंधात होते. पण काल त्यांच्यात भांडण झाले. दिल्लीच्या शाहबाद डेअरी पीएस हद्दीत एका 16 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने वार करून हत्या केली. साहिल असं आरोपीचं नाव आहे. साहिल आणि मृतक हे नातेसंबंधात होते पण काल त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर आरोपीने तरुणीवर वीस वेळा चाकूने आणि नंतर दगडाने वार केले. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पीएस शाहबाद डेअरी येथे 302 आयपीसी अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

दिल्ली पोलिस उपायुक्त सुमन नलवा यांनी या भीषण घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि साहिलला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन दिलं आहे. डीसीपी नलवा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, शाहबाद डेअरी पीएस हद्दीत काल एका खून प्रकरणाची नोंद झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपीची ओळख पटली असून आम्ही लवकरच त्याला अटक करू.