Saat Phere Mandatory In Hindu Marriage: 'सप्तपदीशिवाय हिंदू विवाह वैध नाही', उच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, सप्तपदी हा हिंदू विवाहाच्या वैधतेसाठी आवश्यक घटक आहे. सर्व प्रथा आणि विधींसह पूर्ण झालेला विवाह सोहळाच कायद्याच्या दृष्टीने वैध विवाह मानला जाऊ शकतो.
हिंदू धर्मात विवाह हे एक पवित्र बंधन मानले जाते. लग्नासाठी अनेक विधी सांगितले आहेत. त्यामध्ये सिंदूर दान, कान्यादान, सप्तपदी अशा महत्वाच्या विधींचा समावेश आहे. सर्वसामान्यपणे असे मानले जाते की असे विधी झाले नाहीत, तर तो विवाह वैध नाही. आता अलाहाबाद उच्च न्यायालयानेही हीच बाब आपल्या निर्णयात स्पष्ट केली आहे. न्यायालयाच्या मते ‘सात फेऱ्यां’शिवाय म्हणजेच सप्तपदीशिवाय हिंदू विवाह वैध मानला जाऊ शकत नाही.
वाराणसीच्या रहिवासी स्मृती सिंह उर्फ मौसमी सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी ही टिप्पणी केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, सप्तपदी हा हिंदू विवाहाच्या वैधतेसाठी आवश्यक घटक आहे. सर्व प्रथा आणि विधींसह पूर्ण झालेला विवाह सोहळाच कायद्याच्या दृष्टीने वैध विवाह मानला जाऊ शकतो. तसे नसेल तर असा विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध विवाह मानला जाणार नाही. स्मृती सिंह यांच्यावर त्यांचा पती आणि सासरच्या मंडळींनी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप केला होता. मात्र हा विवाह झाला नसल्याचे सिद्ध झाले, त्यामुळे न्यायालयाने 21 एप्रिल 2022 रोजी याचिकाकर्त्याविरुद्ध जारी केलेले समन्स आणि तक्रार प्रक्रिया रद्द केली. (हेही वाचा: UP Shocker: अयोध्येत इयत्ता पाचवीमधील मुलीला विवस्त्र करून तिच्या प्रायव्हेट पार्ट्सना केला स्पर्श; आरोपी मुख्याध्यापकाला अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)