UP Shocker: अयोध्येत इयत्ता पाचवीमधील मुलीला विवस्त्र करून तिच्या प्रायव्हेट पार्ट्सना केला स्पर्श; आरोपी मुख्याध्यापकाला अटक (Video)
अहवालानुसार, ही घटना शनिवारी (16 सप्टेंबर) रोजी घडली. शाळ सुटल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी घरी जात होती परंतु मुख्याध्यापक रिजवान अहमद याने तिला अडवले आणि शाळेतच थांबण्यास सांगितले.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्येतील (Ayodhya) एका शाळेत अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिचे प्रायव्हेट पार्ट तपासल्याप्रकरणी एका मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. शाळेचा मुख्याध्यापक असलेल्या शिक्षकाने आपल्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीसोबत हे लज्जास्पद कृत्य केले. या घटनेनंतर मुलगी इतकी घाबरली की, तिने शाळेत जाणे बंद केले. बाबा बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रुदौली तहसील परिसरात असलेल्या एका शाळेत ही घटना घडली.
अहवालानुसार, ही घटना शनिवारी (16 सप्टेंबर) रोजी घडली. शाळ सुटल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी घरी जात होती परंतु मुख्याध्यापक रिजवान अहमद याने तिला अडवले आणि शाळेतच थांबण्यास सांगितले. शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासह सर्वजण निघून गेल्यावर मुख्याध्यापकाने मुलीला जबरदस्तीने वर्गात नेले आणि दरवाजा आतून बंद केला.
#अयोध्या : थाना बाबा बाजार के एक प्राथमिक विद्यालय की घटना का वीडिओ आया सामने, शिक्षक ने शिक्षा जगत को किया शर्मशार, नाबालिक छात्रा के कपड़े उतार कर प्राइवेट पार्ट को किया था चेक, चेक करते वक़्त शिक्षक ने छात्रा संग की गंदी हरकत, पिता की शिकायत पर पुलिस ने शिक्षक को गिरफ्तार कर… pic.twitter.com/qyZXQszjn5
— Nedrick News (@nedricknews) September 30, 2023
त्यानंतर त्याने मुलीला कपडे काढण्यास भाग पाडले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. मुख्याध्यापकाने मुलीला ही घटना कोणाला सांगू नको, अशी धमकीही दिली. मुलगी इतकी घाबरली होती की, तिने त्याच्या धमक्यांना बळी पडून घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही. या घटनेनंतर मुलीने शाळेत जाणेही बंद केले. सुरुवातीला, मुलीच्या पालकांना वाटले की ती आजारी असल्याने शाळेत जाण्यास नकार देत आहे. (हेही वाचा: Chhattisgarh Rape Case: किशोरवयीन मुलाने 6 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, रायपूरमधील धक्कादायक घटना)
मात्र मुलीला खोदून विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला पोलीस ठाण्यात नेले आणि मुख्याध्यापकाविरोधात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत मुख्याध्यापकाला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, प्राचार्य रिजवान अहमद याला अटक केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलीस स्टेशनमध्ये प्राचार्य उभा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2023 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

