Chhattisgarh Rape Case: किशोरवयीन मुलाने 6 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, रायपूरमधील धक्कादायक घटना
छत्तीसगडमधील रायपूर शहराच्या बाहेरील भागात एका सहा वर्षांच्या मुलीवर एका किशोरवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Chhattisgarh Rape Case: उज्जैन बलात्कार (Ujjain Rape Case) प्रकरण ताजी असताना दरम्यान छत्तीसगडमधील रायपूर शहराच्या बाहेरील भागात एका सहा वर्षांच्या मुलीवर एका किशोरवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 सप्टेंबर रोजी दुपारी धारसिन्वा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात ही घटना घडली, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लखन पटले यांनी शुक्रवारी माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याला बाल न्यायालयात उभे केले आहे.
छत्तीसगड मध्ये किशोरवयीन मुलाने 6 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी ही आरोपी मुलाच्या शेजारीची रहिवाशी आहे. किशोरवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे पोलीसांना खबर मिळाली. घटनास्थळी पोहचून चौकशी केली तर पोलीसांना या घटनेची संदर्भात माहिती मिळाली. मुलगी आजारी पडल्याने तीला रुग्णालयात दाखल केले होते.
नंतर तिला रायपूरच्या डॉ बीआर आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (रायपूर शहर) यांनी सांगितले. मुलीवर उपचार सुरू असून ती धोक्याबाहेर असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुलीच्या नातेवाईकांनी पोलीसांत तक्रार दिल्यानुसार, पोलिसांनी आयपीसीच्या संबंधित कलम आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास सुरू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2023 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

