Robotic Elephant In Kerala Temple: केरळात आता रोबोटिक हत्ती करणार धार्मिक विधी
केरळमधील एका मंदिरात रोबोटिक हत्ती हा धार्मिक कार्यांसाठी वापरण्यात येणार आहे
केरळातील (Kerala) त्रिशूरमधील इरिंजादपिल्ली श्री कृष्ण मंदिरातील एक रोबोटिक हत्ती (Robotic Elephant) सध्या चर्चेत आहे. 11 फीट ऊंच रोबोटिक हत्तीचे वजन हे 800 किलो असून धार्मिक अनुष्ठानामध्ये त्याचा वापर होणार आहे. या मंदिराला हा हत्ती पेटा (Peta) म्हणजेच पीपल फॉर एथिकस ट्रिटमेंट ऑफ एनिमल्स इंडियाने दिला आहे. या हत्तीचे नाव इरिंजादपिल्ली रमन असे असून हा चालू फिरु शकतो, त्यामुळे त्याचा वापर हा मिरवणूकीतही होऊ शकतो. या हत्तीला लोखंडी फ्रेमने तयार केले असून बाहेरुन त्याला रबर कोटींग वापरली आहे. याची किंमत पाच लाख इतकी आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)