काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी
गेले काही दिवस काश्मीरमध्ये विक्रमी संख्येनं पर्यटक येत असून श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम आणि अन्य ठिकाणची हॉटेल्स, गेस्ट हाउसेस आणि हाउस बोट यंदाच्या उन्हाळी मोसमात पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.
काश्मीर खोरं पर्यटकांनी फुलून गेलं आहे. गेले काही दिवस काश्मीरमध्ये विक्रमी संख्येनं पर्यटक येत असून श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम आणि अन्य ठिकाणची हॉटेल्स, गेस्ट हाउसेस आणि हाउस बोट यंदाच्या उन्हाळी मोसमात पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. यंदाच्या मार्च महिन्यात दीड लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. सध्या सुरु असलेल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं जम्मू इथल्या माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या संख्येनं देखील विक्रम नोंदवला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)