Rajasthan Shocker: राजस्थानमध्ये महिलेला कारच्या बोनेटवर ५०० किमीबसून नेलं फरफटत, व्हिडिओ व्हायरल
राजस्थान मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलां सोबत गुन्हेगारी वाढच चालली आहे.
Rajasthan Shocker: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये राजस्थानमधील एक कार (Car) चालक एका महिलेला कारच्या बोनेटवर सुमारे 500 मीटरपर्यंत फरफटत नेताना दिसत आहे. महिलेला वाचवण्यासाठी अनेक जण गाडीच्या मागे धावताना दिसले, मात्र चालकाने आपले वाहन थांबवले नाही. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी हनुमानगडच्या मुख्य बसस्थानकाजवळ घडली, असे पोलिसांनी सांगितले. पोलीसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली
अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर, कारचा क्रमांक स्पष्ट झाला, जो रावला येथील आहे, असे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण घटना बसस्थानकाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस महिला आणि कार चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या संदर्भात चौकशी चालू केली आहे. या घटने अंतर्गत राजस्थानेचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राज्यवर्धन सिंह राठोड यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर, हँडलवर व्हिडिओ शेअर केला. आणि या संदर्भात राजस्थान मध्ये दिवसेंदिवस महिले संदर्भात गुन्हा वाढत चालल्याचे खंत व्यक्त केली आहे. पोलीसांनी या घटने अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)