Punjab Shocker: जालंधर येथील कालव्याजवळ सापडला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह, चौकशी सुरू

पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात कालव्याजवळ एका पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Punjab Shocker: पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात कालव्याजवळ एका पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर संपुर्ण शहर हादरलं आहे. दलबीर सिंग असं  मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते. जालंधर मधील बस्ती बावा कालवा येथील रस्त्याच्या कडेला मृतदेह सापडला. डोक्याला गंभीर जखमा असलेला मृतदेह आढळून आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री मृत्यू झाला आहे. दलबीर सिंग हे संगरूर येथे पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)