Amravati News: बेड बॉक्समध्ये सापडले आई-मुलाचे मृतदेह,चौकशी चालू;अमरावती हादरली

अमरावती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Amravati News: बेड बॉक्समध्ये सापडले आई-मुलाचे मृतदेह,चौकशी चालू;अमरावती हादरली
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Amravati News: महाराष्ट्रातील अमरावती येथून समोर एका धक्कादायक घटना समोर आली आहे.  महाराष्ट्र  अमरावती शहरात एका बेड बॉक्समध्ये आई आणि तिच्या मुलाचे मृतदेह सापडले. शनिवारी ही पोलीसांना मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळहळ उडाली आहे. नीलिमा गणेश कापसे (४५) आणि तिचा 22 वर्षीय मुलगा आयुष कापसे अशी मृतांची नावे आहेत. घरातून दुर्गंधी आल्यामुळे शेजारच्यांनी मृत्यांच्या नातेवाईकांना खबर दिली. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली.

शेजारच्यांना पीडितांच्या निवसास्थानातून दुर्गंधी येत असल्याने घरातील इतर नातेवाईकांना माहिती दिली. त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलीसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी देखील घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. पोलीसांच्या मदतीने बंद दरवाजा तोडण्यात आले. दरवाजा तोडताच दुर्गंधी आली. घराच्या बेडवर रक्ताचे डाग आणि भयावह परिस्थीती दिसली.  घराच्या बेडच्या बॉक्समध्ये दोघांचे मृतदेह सापडले.

पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आहे. ही हत्या कोणी केली, याच्या तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या अटकेत असेल असा दावा पोलीसांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी हत्या झाल्याची अंदाज वर्तवला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 01:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).