Varanasi Election Result 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी 1 लाख मतांनी आघाडीवर, काँग्रेस उमेदवार अजय राय पिछाडीवर

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे एक लाख मतांनी आघाडीवर आले आहेत. त्यामुळे भाजप पक्षात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

PM Narendra Modi VS Ajay Rai PC FB

Varanasi Election Result 2024:  वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे एक लाख मतांनी आघाडीवर आले आहेत. त्यामुळे भाजप पक्षात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.  काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनीही काशीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेस आघाडीचे जोरदार पुनरागमन होताना दिसत आहे. समाजवादी पक्ष 36 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 36 जागांवर पुढे आहे. तर एनडीएचा भाग असलेल्या आरएलडीला दोन्ही जागांवर विजय मिळताना दिसत आहे. कॉंग्रेसचे अजय राय यांना 265421 मत मिळाले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 365999 मत मिळाले आहे. (हेही वाचा- भाजप आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते एकमेंकाशी भिडले, लखनऊ येथील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now