Amit Thackeray : 'मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं!'; राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीवर अमित ठाकरेंची पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता त्या चर्चा सत्यात येण्याची चिन्ह आहेत. कारण आज राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीचा साक्षीदार राहिल्याचा आनंद सोशल मीडियावर पोस्टमधून व्यक्त केला आहे.

Photo Credit - Facebook

Amit Thackeray : जसजशा निवडणूकांच्या तारखा जवळ येत आहेत. तसतशा राजकीय हलचाली वाढताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी आज दिल्ली गाठत अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरेंचा ( Raj Thackeray) हा दौरा सध्या चर्चेत आहे. आत्तापर्यंत राज्यात भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं आहे. त्यामुळे ही भेट नव्या बदलाची नांदी मानली जाते आहे. अमित ठाकरेंनीही (Amit Thackeray ) राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीचा फोटो सोशल मीडिावर पोस्ट केला आहे. (हेही वाचा : Raj Thackeray On Ram Mandir: आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली; राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement