Aaditya Thackeray On NDA Sarkar: 'सरकार बनताच आश्वासनं आणि पक्ष मोडण्याची भाजपाची जूनी सवय' म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिला भाजपाच्या मित्रपक्षांना 'हे' पद मिळवण्याचा सल्ला!

तेलगू देसम पार्टी आणि जनता दल युनाटेड यांना अनुभव असेलच असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यंदा तिसर्‍यांदा विराजमान होत आहे पण यंदा भाजपाकडे पूर्ण बहुमत नसल्याने मोदींची कसोटी लागणार आहे. अशात आज एनडीए सरकार च्या संसदीय दलाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत भाजपाला चिमटा काढला आहे तर एनडीए तील त्यांच्या मित्रपक्षांना सल्ला दिला आहे.  'भाजपच्या डावपेचांचा अनुभव घेता, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, ते आश्वासने मोडतील आणि तुमचे पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सभापदी पद मिळवा' असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तेलगू देसम पार्टी आणि जनता दल युनाटेड यांना अनुभव असेलच असेही त्यांनी म्हटलं आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)