PM Modi's French Connection: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी अलायन्स फ्रँकाइसचे सदस्यत्व घेतल्याची करून दिली आठवण (See Photo)

भारताचा विकस वेगवान व्हावा याकरिता देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

PM Narendra Modi (PC - ANI)

PM Modi's French Connection:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसांच्या पॅरिस दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना फ्रान्ससोबतच्या त्यांच्या चार दशकांच्या जुन्या नातेसंबंधाची आठवण करून दिली. गुजरातमधील अहमदाबाद येथे सांस्कृतिक केंद्र उघडले तेव्हा सुमारे 40 वर्षांपूर्वीचे फ्रान्ससोबतचे त्यांचे वैयक्तिक संबंध त्यांनी नमूद केले.

“फ्रान्सशी माझे स्वतःचे वैयक्तिक संबंध खूप जूने आहेत. सुमारे 40 वर्षांपूर्वी  गुजरात येथील  अहमदाबाद येथे एक सांस्कृतिक केंद्र उघडण्यात आले," असे पंतप्रधान मोदी यांनी पॅरिसमधील ला सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले. त्या सांस्कृतिक केंद्राशी निगडित होणारी पहिली व्यक्ती म्हणून पंतप्रधानांनी त्यांची भूमिका अधोरेखित केली.

Alliance Française ही शतकानुशतके जुनी संस्था आहे जी परदेशात फ्रेंच भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे फ्रान्सबद्दल समज आणि प्रशंसा वाढवण्यास मदत करते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement