Chicken Loot on Kannauj Expressway: चालकाचे झोपेवरचे नियंत्रण सुटल्याने कोंबड्यांनी भरलेला ट्रक उलटला; स्थानिकांनी डाव साधला (Video)

कन्नौज एक्सप्रेसवेवर कोंबडी घेऊन जाणारा पिकअप ट्रक उलटल्याची घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी विखुरलेल्या कोंवड्या पळवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Photo Credit- X

Chicken Loot on Kannauj Expressway: अमेठीहून फिरोजाबादला कोंबडी (Chicken) घेऊन जाणारा पिकअप ट्रक उलटल्याची घटना घडली. कन्नौज एक्सप्रेसवेवरून (Kannauj Expressway) जाताना चालकाला झोप लागल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवळपास कोणी नसल्याचे पाहून स्थानिकांनी संधीचा फायदा घेत विखुरलेले कोंबड्या पळवून नेल्या., याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस आणि उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (UPEIDA) चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी गर्दी पांगवली आणि शांतता पूर्ववत केली. ट्रक चालकासह जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. (Baby Elephant Dance Video: मंदिरात डान्स करणाऱ्या छोट्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

कोंबड्यांनी भरलेला ट्रक उलटला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now