SC on Theft In Train: रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करावे; 18 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणात प्रवासी कमरेला बांधलेल्या बेल्टमध्ये 1 लाख रुपये रोख घेऊन जात होता. रेल्वे प्रवासादरम्यान रोकड चोरीला गेली. ही घटना 2005 ची आहे.
SC on Theft In Train: 2005 मध्ये एका प्रवाशाची रेल्वे प्रवासादरम्यान 1 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. यानंतर ग्राहक आयोगाने या प्रवाशाला त्याचे पैसे परतफेड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने आज ग्राहक आयोगाचा हा आदेश बाजूला ठेवला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने हा आदेश बाजूला ठेवताना सांगितले की, ही रेल्वेची कमतरता नाही. जर प्रवासी स्वत:च्या सामानाचे रक्षण करू शकत नसेल तर यासाठी रेल्वेला जबाबदार धरता येणार नाही.
सुनावणीदरम्यान, रेल्वेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणात प्रवासी कमरेला बांधलेल्या बेल्टमध्ये 1 लाख रुपये रोख घेऊन जात होता. रेल्वे प्रवासादरम्यान रोकड चोरीला गेली. ही घटना 2005 ची आहे, जेव्हा कापड व्यापारी - सुरेंद्र भोला, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्यांचे पैसे हरवले. (हेही वाचा - SC on Bike-Taxi Ban In Delhi: राजधानीत बाइक, टॅक्सी, UBER आणि Rapido वर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिली स्थगिती)
Theft during train ride not deficiency in service; passengers have to protect own belongings: Supreme Court
report by @AB_Hazardous https://t.co/jsFGkOSAED
— Bar & Bench (@barandbench) June 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

