Odisha Lightning Strikes: ओडिसात मुसळधार पावसाचा कहर, ६ जिल्ह्यात वीज पडून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू तर ३ जण जखमी
ओडिसा राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. ६ जिल्ह्यात वीज पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १० जणांनी जीव गमावला.
Odisha Lightning Strikes: ओडिशा राज्यात जोरदार पाऊस झाला सोबत वीजेचा कडकडात देखील सुरु आहे. मुसळधार पावसात राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये वीज पडून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. अपघाताबाबत, विशेष मदत आयुक्त कार्यालयाने सांगितले की, वीज पडल्याने खुर्द जिल्ह्यात चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौध, जगतसिंगपूर आणि ढेंकनाल येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष आयुक्त कार्यालयाने सांगितले की, विजेच्या धक्क्याने खुर्दा जिल्ह्यात आणखी तीन जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारीही कोलकात्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement