आता अदानी समूह IRCTC ला देणार आव्हान, Gautam Adani रेल्वे क्षेत्रात ठेवणार पाऊल
अदानी एंटरप्रायझेसने शुक्रवारी याची घोषणा केली.
अदानी समूह (Adani Group) आता रेल्वे क्षेत्रातही उतरण्याच्या तयारीत आहे. वास्तविक अदानी समूह आता ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म खरेदी करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच आता अदानी एंटरप्रायझेस लवकरच ऑनलाइन रेल्वे तिकीट विक्री करणार आहे. अदानी समुहाचे हे पाऊल इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग व्यवसायात आव्हान देईल. अदानी एंटरप्रायझेसने शुक्रवारी याची घोषणा केली. अदानी समूहाने भारतीय शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली. ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म, स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100 टक्के स्टेक घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती गटाने दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)