Noida Car Fire: कारला लागलेल्या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू, नोएडा येथील घटना
नोएडा येथील सेक्टर - ११९ येथील आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीमध्ये एक कारला आग लागल्यामुळे दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
Noida Car Fire: नोएडा येथील सेक्टर - ११९ येथील आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीमध्ये एक कारला आग लागल्यामुळे दोघांचा होरपळून मृत्यू झाला. नोएडा येथील सेक्टर ११३ येथील पोलिस स्टेशनला सूचना मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्यापही समजले नाही. अग्निशमन दलाकडून दोन मृतांना कारमधून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)